Ad will apear here
Next
‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे फणी वादळग्रस्तांना मदत

मुंबई : ओडिशा येथे झालेल्या फणी वादळाच्या तीव्रतेमुळे असंख्य जणांनी आपली घरे व दैनंदिन रोजगार गमावला. वादळाच्या तडाख्यामुळे बेघर झालेल्या लोकांना आधार व पाठिंबा देण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांनी मदतकार्य व पुनर्वसनाचे नियोजन केले आहे. त्यांच्या वतीने वादळग्रस्तांना अन्न व अन्य वस्तूंच्या रूपात मदत केली जाणार आहे. 


वादळामुळे आलेले संकट विचारात घेता फिनोलेक्स बाधित कुटुंबांना दररोज जेवण व पिण्याचे पाणी, तसेच अन्य आवश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम प्रामुख्याने पुरी, खुर्गा व कटक येथील बाधित ठिकाणी राबवला जाणार आहे. 


या विषयी बोलताना ‘मुकुल माधव’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, ‘ओडिशातील वादळाच्या निमित्ताने, गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करण्याची माणुसकीची भावना दिसून आली. भारतात गेल्या २० वर्षांतील हे सर्वांत विध्वंसक चक्रिवादळ होते, तरी सरकारने वादळापासून कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी पावले उचलली होती. वादळाचा तडाखा बसलेल्या व मदतीची गरज असलेल्या लोकांना शक्य तितकी मदत करण्याचा ठाम निर्णय कंपनीने एकमताने घेतला आहे. ‘फिनोलेक्स’ची मूलभूत विचारसरणी समाजाचे कल्याण करण्यावर आधारित राहिली आहे आणि अशा संकटांप्रमाणे गरजेच्या वेळी बाधितांचा त्रास कमी करण्यासाठी पुढाकार घेणे व पाठिंबा देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZPTCA
Similar Posts
आदिवासी गावांत २०७ शौचालयांची उभारणी पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण २०९ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील चौथ्या टप्प्यांत वाडा तालुक्यातील केलटान, सापाने व कारळगाव येथे ७७ शौचालयांचे व सोलर पंपाचे उद्घाटन १५ जून २०१९ रोजी झाले
‘टाटा पॉवर’तर्फे ओडिशातील वादळग्रस्तांना मदत नवी दिल्ली : ओडिशामध्ये नुकत्याच आलेल्या फनी वादळामुळे संपूर्ण राज्यभरात नुकसान झाले. या वादळानंतर आता ओडिशातील सुमारे १० दशलक्ष नागरिकांची अनियमित वीज पुरवठ्यामुळे गैरसोय होत आहे. भुवनेश्वरसह बहुतांश किनारपट्टीभागातील सुमारे एक लाख वीजेचे खांब उन्मळून पडले असून, अनेक सबस्टेशन आणि लो ट्रान्समिशन लाइन्स पूर्णपणे बंद पडल्या आहेत
‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांसाठी विविध सुविधा मुंबई : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एफआयएल) आणि कंपनीची सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) पंढरपूरच्या वारकऱ्यांना वारीदरम्यान सुविधा उपलब्ध करून दिल्या. यात वारकऱ्यांना त्यांच्या चीजवस्तू ठेवण्यासाठी टिकाऊ पिशव्या, वैद्यकीय शिबिरे आणि रात्रीच्या विश्रांतीसाठी तीन थांब्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे
‘फिनोलेक्स’ व ‘मुकुल माधव’कडून ‘ससून’ला दोन कोटींचे अर्थसाह्य पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्याकडून ससून सर्वोपचार रुग्णालयाला दोन कोटी रुपयांच्या अर्थसाह्यातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देण्यात आली आहेत. १६ एप्रिल २०१९ रोजी नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या (एनआयसीयू) दुसऱ्या, तर एंडोस्कोपी युनिटच्या पहिल्या वर्धापन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language